शनिवार, १० मार्च, २०१२

माझ्या काही कविता

1

समोरच्या हिरव्यागार संथ तळ्याच्या पोटात
तरंगणाऱ्या शेवलासाराखाच पदार्थ तरंगतोय
हातातल्या सिरीन्ज्मधल्या  द्रवात
तळे  झाकोळले  आहे हिरव्या झाडांच्या सावळ्या सावल्यांनी
वरच्या निळ्या लख्ख आभाळासारखे हे चराचर
डोळ्यात न सामावणारे ,त्यातला एक कण मी
माझे हात शोधू पाहतायत अभावितपणे
माझ्या जड टपोर पोटावरून सोनोग्रफिच्या ओलसर
त्वचेच्या आत दडलेल्या अनाम रोगजंतूंचा पसारा
पाठीशी हॉस्पिटलच्या इमारतीतून चालू झालेली लगबग
समोर अखंड वेग लाभलेल्या राहादारीसाठीचा रस्ता
पोटात अनोळखी आगन्तुकाने व्यापून टाकलेल्या वाटा
काय झालय तरी काय आपल्याला ?

२

               

२ टिप्पण्या: