गूढ काळोखातून उगवून तरंगत
पसरणाऱ्या या पेशींच्या लाटा
देहाच्या किनाऱ्यावर धडका देतायत कधीच्या
त्याचा गंभीर काळोखा नाद मला ऐकू येउ नये ?
त्याच्या थंडगार हातांचे रमल वेढतेय माझे अस्तित्व
काळोख पसरत चाललाय देहभर
न विचारताच आक्रमून घेणाऱ्या
या पावलांनी मला कधी विचारू नये माझ्याच रक्तातली पाऊल वाट ?
पावसानंतर रस्त्याच्या कडेकडेने सैरावैरा
वाढत सुटणाऱ्या गवतासारखी काळोखाची फुलं वाढतायत आत
मुळांनी शोषून घेतायत अवघ्या प्रदेशातले पाणी खोलवर
आयुष्य वाहवत नेतायत दूरवर आणि मला कळूही नये माझ्यातलेच
हे दुखरे , हट्टी, कोशात गुरफटून वाढत जाणारे
बिनचेहर्याचे अरूप इंद्रजाल?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा