शुक्रवार, २३ मार्च, २०१२

dolyat utarun aleli

डोळ्यात उतरून आलेली झोप युगायुगांची
गात्रांचा कण अन कण थकव्याने ओतप्रोत भरलेला
पाठीतून खोलवर उतरत चाललेले वेदनेचे प्रवाह
झाडावर टकटक करीत पोखरणाऱ्या सुतार पक्ष्यासारखे
काळीज कुरतडून काढणारे शरीरातले रोगजंतू
काय त्यांचे नाव ? कुठला त्यांचा गाव ?
pathology शोधीलच  त्यांचे कुलशील
पण त्यांच्या रक्तातल्या रस्त्यांवरून चालत राहण्याचा
कानोसा का घेता येत नाहीये मला ?
की  वाजत नाहीतच त्यांची पावले ?
की  वाजत असूनही आपलेच मन
ठार आंधळे , मुके , बहिरे होते ?
की ही त्या कुणाची काठी
वाजते पण ऐकू येत नाही म्हणतात अशी ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा