aruna deshmukh
रविवार, ८ एप्रिल, २०१२
aruna deshmukh: aruna deshmukh: माझ्या काही कविता1समोरच्या हिरव्या...
aruna deshmukh: aruna deshmukh: माझ्या काही कविता1समोरच्या हिरव्या...: aruna deshmukh: माझ्या काही कविता 1 समोरच्या हिरव्यागार संथ तळ्य... : माझ्या काही कविता 1 समोरच्या हिरव्यागार संथ तळ्याच्या पोटात ...
सोमवार, २ एप्रिल, २०१२
aruna deshmukh: माझ्या काही कविता1समोरच्या हिरव्यागार संथ तळ्य...
aruna deshmukh: माझ्या काही कविता
1
समोरच्या हिरव्यागार संथ तळ्य...: माझ्या काही कविता 1 समोरच्या हिरव्यागार संथ तळ्याच्या पोटात तरंगणाऱ्या शेवलासाराखाच पदार्थ तरंगतोय हातातल्या सिरीन्ज्मधल्या द्रवात ...
1
समोरच्या हिरव्यागार संथ तळ्य...: माझ्या काही कविता 1 समोरच्या हिरव्यागार संथ तळ्याच्या पोटात तरंगणाऱ्या शेवलासाराखाच पदार्थ तरंगतोय हातातल्या सिरीन्ज्मधल्या द्रवात ...
शुक्रवार, २३ मार्च, २०१२
dolyat utarun aleli
डोळ्यात उतरून आलेली झोप युगायुगांची
गात्रांचा कण अन कण थकव्याने ओतप्रोत भरलेला
पाठीतून खोलवर उतरत चाललेले वेदनेचे प्रवाह
झाडावर टकटक करीत पोखरणाऱ्या सुतार पक्ष्यासारखे
काळीज कुरतडून काढणारे शरीरातले रोगजंतू
काय त्यांचे नाव ? कुठला त्यांचा गाव ?
pathology शोधीलच त्यांचे कुलशील
पण त्यांच्या रक्तातल्या रस्त्यांवरून चालत राहण्याचा
कानोसा का घेता येत नाहीये मला ?
की वाजत नाहीतच त्यांची पावले ?
की वाजत असूनही आपलेच मन
ठार आंधळे , मुके , बहिरे होते ?
की ही त्या कुणाची काठी
वाजते पण ऐकू येत नाही म्हणतात अशी ?

रविवार, ११ मार्च, २०१२
गूढ काळोखातून उगवून तरंगत
पसरणाऱ्या या पेशींच्या लाटा
देहाच्या किनाऱ्यावर धडका देतायत कधीच्या
त्याचा गंभीर काळोखा नाद मला ऐकू येउ नये ?
त्याच्या थंडगार हातांचे रमल वेढतेय माझे अस्तित्व
काळोख पसरत चाललाय देहभर
न विचारताच आक्रमून घेणाऱ्या
या पावलांनी मला कधी विचारू नये माझ्याच रक्तातली पाऊल वाट ?
पावसानंतर रस्त्याच्या कडेकडेने सैरावैरा
वाढत सुटणाऱ्या गवतासारखी काळोखाची फुलं वाढतायत आत
मुळांनी शोषून घेतायत अवघ्या प्रदेशातले पाणी खोलवर
आयुष्य वाहवत नेतायत दूरवर आणि मला कळूही नये माझ्यातलेच
हे दुखरे , हट्टी, कोशात गुरफटून वाढत जाणारे
बिनचेहर्याचे अरूप इंद्रजाल?

शनिवार, १० मार्च, २०१२
माझ्या काही कविता
1
समोरच्या हिरव्यागार संथ तळ्याच्या पोटात
तरंगणाऱ्या शेवलासाराखाच पदार्थ तरंगतोय
हातातल्या सिरीन्ज्मधल्या द्रवात
तळे झाकोळले आहे हिरव्या झाडांच्या सावळ्या सावल्यांनी
वरच्या निळ्या लख्ख आभाळासारखे हे चराचर
डोळ्यात न सामावणारे ,त्यातला एक कण मी
माझे हात शोधू पाहतायत अभावितपणे
माझ्या जड टपोर पोटावरून सोनोग्रफिच्या ओलसर
त्वचेच्या आत दडलेल्या अनाम रोगजंतूंचा पसारा
पाठीशी हॉस्पिटलच्या इमारतीतून चालू झालेली लगबग
समोर अखंड वेग लाभलेल्या राहादारीसाठीचा रस्ता
पोटात अनोळखी आगन्तुकाने व्यापून टाकलेल्या वाटा
काय झालय तरी काय आपल्याला ?
२

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)